सोन्याच्या किमतीमधे मागील काही दिवसापासून सतत घसरण होत आहे. आजही सोन्याच्या दर घसरला आहे आणि सोन्याची किंमत ही 95 हजाराच्या खाली आली आहे. 24 आणि 22 कारेत सोन्याचे दर खाली दिले आहेत.
सोन्याची किंमत कमी होण्याची कारणे
आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये डॉलरच्या स्थितीमुळे आणि व्यापार – युद्धाची कमी झाल्यामुळे सोन्याच्या किमतीमध्ये सतत घसरण होत आहे. आज सुद्धा किमतीमध्ये घसरण झाली आहे. आज मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किमती या सहा महिन्यातील सर्वात मोठ्या आठवडी घसरणीच्या तयारीत आहेत.
अमेरिकेने ब्रिटन ,चीन आणि सौदी अरेबिया सोबत व्यापार करार जाहीर केल्यानंतर या महिन्यात सोन्याच्या किमती कमी झाल्या आहेत. जगभरातील सोन्याचे भाव हे एका महिन्यातील सर्वात कमी पातळीवर आहेत. अमेरिका आणि चीनमधील व्यापार करार, रशिया- युक्रेन युद्ध ,भारत पाकिस्तान युद्ध थांबताना दिसत आहेत , त्यामुळे याचा परिणाम भारताच्या सोन्याच्या बाजारपेठेवरील झाला आहे.
आज 16 मे रोजी भारतात 24 कॅरेट सोन्याचा दर 9,392 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याचा दर 8,609 रुपये प्रति ग्रॅम आहे. भारतीयांमध्ये सोने विषयी एक खास आकर्षण आहे. सोने दागिने आणि बचत म्हणून वापरले जाते. सोन्याच्या किमतीमुळे दीर्घकालीन नफा मिळेल यासाठी लोक सोने खरेदी करतात आणि मागील काही वर्षापासून सोन्याच्या किमतीने सतत चांगला परतावा दिला आहे. भारत आणि पाकिस्तान मध्ये संघर्ष संपल्यानंतर दरामध्ये स्थिरता आल्यामुळे सोन्याचा दर घसरत आहेत. तुमच्या शहरातील सोन्याचे दर हे खाली दिले आहेत.
City | 22K Gold Price | 24K Gold Price | 18K Gold Price |
---|---|---|---|
Delhi | ₹86,240 | ₹94,070 | ₹70,560 |
Chandigarh | ₹86,240 | ₹94,070 | ₹70,560 |
Lucknow | ₹86,240 | ₹94,070 | ₹70,560 |
Jaipur | ₹86,240 | ₹94,070 | ₹70,560 |
Nashik | ₹86,120 | ₹93,950 | ₹70,470 |
Surat | ₹86,140 | ₹93,970 | ₹70,480 |
Mumbai | ₹86,090 | ₹93,920 | ₹70,440 |
Pune | ₹86,090 | ₹93,920 | ₹70,440 |
Nagpur | ₹86,090 | ₹93,920 | ₹70,440 |
Chennai | ₹86,090 | ₹93,920 | ₹70,440 |
Bengaluru | ₹86,090 | ₹93,920 | ₹70,440 |
Kerala | ₹86,090 | ₹93,920 | ₹70,440 |
Kolkata | ₹86,090 | ₹93,920 | ₹70,440 |
Hyderabad | ₹86,090 | ₹93,920 | ₹70,440 |