Weather Update: भारतीय हवामान विभागाने (IMD) ने सांगितले आहे की हवामानात मोठा बदल झालेला आहे. अनेक ठिकाणी पूर्व मोसमी पाऊस वादळी वाऱ्यासह सुरू आहे. यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांमध्ये तापमानामध्ये लक्षणीय घट झालेली आहे यामुळे सर्वसामान्यांना उन्हाळ्याच्या झळयांन पासून सुटका मिळालेली आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने गुरुवारी महाराष्ट्राच्या काही भागासाठी Orange अलर्ट जारी केला असून , अनेक भागात वादळ आणि पावसाचा अंदाज वर्तविला आहे. तसेच हवामान विभाग नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना केली आहे.
हवामान विभागाने 16 मे रोजी मुंबईमध्ये शहराच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. रायगड, रत्नागिरी, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि नांदेड येथे काही ठिकाणी कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडेल.
याशिवाय विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्येही हवामान ढग आलेले आणि वादळी वारा राहील , असे सूचित करण्यात आले आहे.
या पावसामुळे काही पिकांना फायदा होण्याची शक्यता असली, तरी वादळी वारे आणि अचानक पडणारा पाऊस यामुळे शेतकऱ्यांनीही शेती संबधी हम करताना हवामानाचा अंदाज घ्यावा.