PM Kisan Installment : पीएम किसान योजनेचा हप्ता या दिवशी येणार, फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार, तुमचे नाव यादीत आहे का ?

Spread the love
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan Yojana: केंद्र सरकारने PM किसान सम्मान निधी ही योजना अल्पभूधारक आणि गरीब शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून दिली जाणार आहे. देशातील कोट्यावधी शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते, दर चार महिन्यांनी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होतात.

पीएम किसान योजनेसाठी आतापर्यंत एक कोटी 25 लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे पण त्यातील 98 लाख शेतकरी सध्या पात्र आहेत. इतर शेतकऱ्यांनी त्यांचे भूमी अभिलेख अपडेट केलेले नाहीत तसेच अनेक शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक बँक खात्याशी जोडला नाही त्यामुळे अनेक शेतकरी या निधी पासून वंचित आहेत.

शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे अनिवार्य

राज्यात शेतकऱ्यांनी स्वयं नोंदणी प्रक्रियेला चांगला प्रतिसाद दिलेला असून आतापर्यंत 36 लाख शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली आहे. तुम्ही सुद्धा केवायसी केलेली नसेल किंवा नोंदणी करायची असेल तर पी एम किसान योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही टी करू शकता.

PM किसान यादीत तुमचे नाव कसे तपासायचे ?

  • PM किसानच्या अधिकृत वेबसाइटला https://pmkisan.gov.in/ भेट द्या.
  • नंतर तेथे ‘ beneficiary list ’ या पर्यायावर क्लिक करा .
  • आपले राज्य, जिल्हा, उपविभाग, गट व गाव निवडा.
  • Get report वर click करा .
  • लाभार्थी यादी तुमच्या screen वर दिसेल.
  • तुमचे नाव शोधा.

PM किसान 20 वा हप्ता कधी येणार

PM kisan 20th installment : या योजनेचा 19वा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये देण्यात आला होता. विसाव्या हप्त्या बाबत अजून कोणतीही घोषणा झाली नसली तरी विसावा हप्ता हा जून महिन्यात येण्याची अपेक्षा आहे. या हप्त्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपये इतकी रक्कम जमा होणार आहे. या हप्त्याचा लाभ 94 लाख शेतकरी घेतील, अशी माहिती कृषी विभागाने दिलेली आहे.

Leave a Comment

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now